कोणत्या लसीकेंद्रात किती लसी उपलब्ध आहे हे सांगणारे अ‍ॅप! 

रॅपीपे आपल्या वेबसाईट आणि अ‍ॅपवरील टूलच्या साह्याने उपभोक्त्याला कोविन वेबसाईटवर उपलब्ध असलेली कोविड लसीकरणाची ताजी माहिती मिळवून देतो.

76

रॅपीपे फिनटेक या असिस्टेट पेमेंट फिनटेक कंपन्यांपैकीच एक असलेल्या अग्रेसर कंपनीने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली असून स्वत:च्या एजंट अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून कोविड-19 लसीकरण नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या रॅपीपे बी2बी अ‍ॅपवर 5 लाखांहून अधिक रिटेलर आणि व्यापाऱ्यांनी इन्स्टॉल केले आहे.

कुठे लसी उपलब्ध आहेत, हे समजणार! 

रॅपीपे आपल्या वेबसाईट आणि अ‍ॅपवरील टूलच्या साह्याने उपभोक्त्याला कोविन वेबसाईटवर उपलब्ध असलेली कोविड लसीकरणाची ताजी माहिती मिळवून देतो. नियमितपणे लाखो रॅपीपे एजंट या अ‍ॅपचा वापर करत असतात. ज्याद्वारे कोट्यवधी ग्राहकांना पेमेंट, एईपीएस तसेच रेमीटन्स सेवेचा लाभ घेता येतो. याच अ‍ॅपचा उपयोग करून एजंट आपल्या ग्राहकांना सोप्या पद्धतीने त्यांच्या भागातील लसीकरणासंबंधी माहिती मिळवायला मदत करणार आहेत. तसेच उपलब्धतेप्रमाणे लसीचा स्लॉट नोंदणी करणे शक्य होईल.

(हेही वाचा : धक्कादायक! भिवंडीतून १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त )

कोविन अ‍ॅप शिवाय करू शकतात नोंदणी!

देशाला कोविड-19 चा जोरदार फटका बसला आहे. या महासाथीतून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर, लवकरात लवकर नागरीकांचे लसीकरण आवश्यक आहे. अलीकडे सरकारने 18 वर्षांहून अधिक वयाच्या नागरीकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. त्यासाठी अगोदर नोंदणी आणि अपॉईंमेंट असणे अनिवार्य असेल. या घोषणेवर बोलताना रॅपीपे’चे सीईओ योगेंद्र कश्यप म्हणाले की, “आपण सर्वांनी एकत्र येऊन या महासाथीचा मुकाबला करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण बाजारांत आजही अनेक जण तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. त्यांना स्वत:हून कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करता येणार नाही. त्यांच्याकरिता आमचे रॅपीपे’चे डायरेक्ट बिझनेस आऊटलेट (डीबीओ) नियमितपणे व्यवसायाकरिता वापरणारे विक्रेते आमच्या या उपक्रमाद्वारे लसीकरण नोंदणी उपलब्ध करून देतील. या सुविधेमुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी आटोक्यात येईल तसेच सध्याची गरज असलेले सोशल डिस्टन्स राखायला मदत होईल, ही आशा करतो.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.