व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच वाघाच्या शिकारीचा प्रयत्न; राज्यात ‘या’ भागात मिळाला बहेली पिंजरा

172
व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच वाघाच्या शिकारीचा प्रयत्न; राज्यात 'या' भागात मिळाला बहेली पिंजरा
व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच वाघाच्या शिकारीचा प्रयत्न; राज्यात 'या' भागात मिळाला बहेली पिंजरा

देशातील मध्य भागातील व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाची शिकार करणारी टोळी सक्रिय असतानाच जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सातारा जिल्ह्यात बहेली सापळा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने याबद्दल राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये अलर्ट जाहीर केला होता.

मे महिन्यात आसाम येथील वाघाच्या शिकारीतील आरोपींचे मोबाईल लोकेशन चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळून आल्यानंतर चंद्रपूर वनविभागाची टीम नुकतीच आसामला जाऊन आली. या घटनेनंतर राज्यात गडचिरोली परिसरातून २६ संशयित आरोपींना वनाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पकडले. त्यांच्याकडे वाघाच्या शिकारीचे साहित्य मिळाले होते. ही घटना ताजी असतानाच साताऱ्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथे सह्याद्री कारखाना परिसरातील डोंगरात बहेली सापळा सापडला आहे.

(हेही वाचा – खांदयात घुसलेल्या बंदुकीच्या गोळीसोबत ‘त्या’ने केला ट्रेन मधून १३ तास प्रवास)

कसा सापडला बहेली पिंजरा

शुक्रवारी शहापूर येथील सह्याद्री साखर कारखाना परिसरात जवळच्या डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा डोंगराळ परिसरात भटकायला गेला होता. कुत्रा घरी परत जाताना रस्त्यावर स्थानिक नागरिक योगेश शिंगण यांनी कुत्र्याच्या पायाला झालेली जखम पाहिली. ही बाब शिंगण यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना पाठवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून रोहन भाटे यांनी त्वरीत उपवनसंरक्षक सातारा तसेच वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो यांना सावध केले. काही संशयास्पद शिकारी भागात वावर असतील तर नागरिकांनी वनविभागास त्वरीत संपर्क करावे. माहिती देणाऱ्या नागरिकांची माहिती गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन सातारा वनविभागाने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.