‘या’ कारणासाठी मुंबई विद्यापीठच उडवण्याची दिली धमकी!

बनावट ईमेल आयडी तयार करून धमकीचे मेल करण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या ई-मेलवर जुलै महिन्यात आलेल्या तीन अनोळखी मेल आयडीवरून धमकी देण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी, १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. धमकीचा मेल पाठवणाऱ्याने बीएस्सी, बीकॉम आणि बीएच्या ६ सेमिस्टरचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा अन्यथा सर्व विद्यापीठ उदध्वस्त करण्यात येईल, अशी धमकी ई-मेलवरून देण्यात आली. या प्रकरणी विद्यापीठ संबंधित अधिकारी यांनी बीकेसी पोलिस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखा येथे तक्रार दाखल करणार आहे.

विद्यापीठाचे संबंधित अधिकारी मेल तपासत असताना प्रकरण उघड

हे मेल १०, ११ आणि १२ जुलैमध्ये आले होते, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. या ई-मेलमुळे मुंबई विद्यापीठात खळबळ उडाली असून हा ई-मेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा पोलिस शोध घेत आहेत. २०२१ मध्ये झालेल्या परीक्षाचे निकाल कामकाज सुरू असताना हे धमकीचे मेल आल्याचे समजते. शुक्रवारी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्याकडून मेल तपासत असतांना १०, ११ आणि १२ जुलै रोजी आलेले हे ई-मेल आढळून आले.

(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)

बनावट ईमेल आयडी तयार करून हे मेल करण्यात आले

त्यात बीएस्सी, बीकॉम आणि बीए च्या ६ सेमिस्टरचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा अन्यथा सर्व विद्यापीठ उदध्वस्त करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. हे मेल कोणी केले याबाबत काही कळू शकले नाही. बनावट ईमेल आयडी तयार करून हे मेल करण्यात आलेले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here