Rani Baug Zoo : राणीबागेतील ‘क्रॉक ट्रेल’च्या देखभालीवरच एक कोटींचा खर्च

211
Rani Baug Zoo : राणीबागेतील ‘क्रॉक ट्रेल’च्या देखभालीवरच एक कोटींचा खर्च
Rani Baug Zoo : राणीबागेतील ‘क्रॉक ट्रेल’च्या देखभालीवरच एक कोटींचा खर्च

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात मे महिन्यांत पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ (मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली असून मगर व सुसर प्रदर्शनीमध्ये बसवण्यात आलेली जीवन समर्थन प्रणाली ही संपूर्ण आशिया खंडातील तसेच भारतातील एकमेव अशी १० दशलक्ष पाणी लिटर स्वच्छ करणारी प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Rani Baug Zoo)

New Project 9 1

सध्या उद्यानात वाघ, बिबट्या पेंग्विन, अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यातच रविवारी ७ मे २०२३ पासून उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळ्याकाठी बनविलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचालीदेखील पर्यटक टीपू शकतात. (Rani Baug Zoo)

(हेही वाचा – Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणीने पटकावलं सुवर्ण पदक)

New Project 10 1

अंडर वॉटर व डेक व्ह्युविंग गॅलरी

प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरीसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेत आहेत. सध्या या ठिकाणी असणाऱ्या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मांसाहारी खाद्य देण्यात येत आहे. (Rani Baug Zoo)

मगर व सुसर प्रदर्शनी मध्ये बसविण्यात आलेली जीवन समर्थन प्रणालीही संपूर्ण आशिया खंडामधील तसेच भारतामधील एकमेव अशी १० लक्ष लीटर पाणी स्वच्छ करणारी प्रणाली असून प्रणाली मध्ये प्रोटीन स्कीम्मर इंडस्ट्रियल ग्रेड एयर कोनप्रेसर, ओझोन जनरेटर आणि यू. व्ही. मशीन अशा यंत्र सामुग्री बसविण्यात आल्या आहेत. पाण्याची गुणवत्ता राखता यावी याकरता या यंत्र सामुग्रीचे योग्य पद्धतीने प्रचालन होणे गरजेचे आहे. अन्यथा याची योग्यप्रकारे देखभाल न झाल्यास पाण्याची गुणवत्ता खराब होईलच तसेच संपूर्ण यंत्रणाही बंद पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Rani Baug Zoo)

अशा प्रकारची यंत्रणा पहिल्यांदाच बसविण्यात आल्यामुळे अशा प्रकारच्या प्रणालीच्या देखभालीचा अनुभव कोणाकडे नाही. त्यामुळे या जीवन समर्थन प्रणाली अर्थात लाइफ सपोर्ट सिस्टीमच्या देखभालीचे काम हे एका वर्षाच्या कालावधीकरिता ज्या कंत्राटदराने जीवन समर्थन प्रणाली बसविली आहे त्यांना देणे सयुक्तिक असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आहे. त्यामुळे ही प्रणाली बसवणाऱ्या स्काय वे कंपनीकडून याच्या देखभालीचे काम करून घेतले जाणार असून यासाठी ९९ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Rani Baug Zoo)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.