मंत्रालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित पीडित महिला कर्मचाऱ्याने याविषयी शासनाकडे तक्रार केल्यावर मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. यासंबंधीची माहिती स्वतः भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.
मंत्री अतुल सावे यांनी घेतली दखल
याविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मंत्रालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा पुरूष अधिकाऱ्याकडून झालेल्या विनयभंगाची घटना निषेधार्ह व संतापजनक आहे. याची संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित पुरुष अधिकाऱ्याची चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. तसेच त्याची चौकशी २ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. हे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. या सरकारमध्ये महिलांचा सन्मान राखला जाईल, तसेच त्यांच्यावर अन्याय, अत्याचारावर न्याय मिळेल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा हलाल प्रमाणपत्र देणारी संघटना दहशतवाद्यांना करतेय अर्थपुरवठा, चौकशीची मागणी)
Join Our WhatsApp Community