CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने मुख्य उद्घाटन कार्यक्रम हा तपोवन मैदान येथे होणार असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजन संदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी २० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

222
CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी
CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी

नाशिक शहरात २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा व नाशिक जिल्ह्याची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचे आपण सर्वांनी सोने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. (CM Eknath Shinde)

तपोवन मैदान येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) उद्घाटन स्थळाची मंगळवारी (०९ जानेवारी) पाहणी करून महोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, ॲड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास धिवसे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Tata Group : टाटा समूहाची महत्वाची घोषणा ; लक्षद्वीपमध्ये बांधणार २ रिसॉर्ट)

विविध भागातून जवळपास ८ हजार युवा होणार सहभागी

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) अनुषंगाने मुख्य उद्घाटन कार्यक्रम हा तपोवन मैदान येथे होणार असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजन संदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी २० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) मॅस्कट व लोगोचेही अनावरण करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून जवळपास ८ हजार युवा सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवास व खानपान व्यवस्थेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. (CM Eknath Shinde)

हनुमाननगर येथील सुविचार स्पर्धा, युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सांघिक लोकनृत्य, वैयक्तिक लोकगीत व वक्तृत्व स्पर्धा, तर महात्मा फुले कलादालनात छायाचित्र स्पर्धा होणार आहे. गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात सांघिक लोकगीत व वैयक्तिक लोकगीत आणि उदोजी महाराज म्युझियम येथे यंग कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग व कथा लेखन असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.