Hawkers In Andheri : अंधेरीतील ‘त्या’ फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आंब्रे मैदानाखालील जागेत भूमिगत बाजार

122
Hawkers In Andheri : अंधेरीतील 'त्या' फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आंब्रे मैदानाखालील जागेत भूमिगत बाजार

अंधेरी पश्चिम येथील फेरीवाल्यांच्या (Hawkers In Andheri) पुनर्वसनासाठी जे पी रोडवरील नवरंग थिएटर समोरील आंब्रे मैदानाच्या खालील बाजूस भूमिगत बाजार निर्माण केला जाणार आहे. या मैदानाच्या खालील बाजूस बाजार निर्माण करून अंधेरी पश्चिम येथील सर्व फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार असून यासाठीची महापालिका प्रशासनाच्यावतीने निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अंधेरी पश्चिम येथे केवळ विशिष्ट समाजाच्या लोकांचेच फेरीचे व्यवसाय असून त्यांच्यासाठी महापालिकेच्यावतीने भूमिगत बाजार बांधला जाणार असल्याने या फेरीवाल्यांचा उद्देश हा व्यावसायिक आहे की केवळ जागा अडवून व्यवसाय करण्याचा आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

(हेही वाचा – Haryana School: हरियाणातील शाळांमध्ये आता ‘Good Morning’ ऐवजी म्हणावे लागेल…)

अंधेरी पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील भागांमध्ये असलेल्या फेरीवाल्यांविरोधात तीव्र कारवाई सुरु असून येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवरंग सिनेमा समोरील आंब्रे मैदानाखालील जागा भूमिगत बाजार बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांनी पुढाकार घेऊन रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करून येथील पात्र फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास आंब्रे मैदानाखालील जागेत भूमिगत बाजार बांधून तिथे व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तांत्रिक तपासणी आणि पाहणी केल्यानंतर या मैदानाखालील जागेत भूमिगत बाजार बांधण्याचे काम हाती घेण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. (Hawkers In Andheri)

(हेही वाचा – पंजाबमधील ८ महामार्ग प्रकल्प रद्द करावे लागतील; Nitin Gadkari असे का म्हणाले?)

अंधेरी पश्चिम येथील स्टेशन परिसरातील भागांमध्ये सर्वाधिक फेरीवाले हे एका विशिष्ट समाजाचेच आहे. याठिकाणी मराठी तसेच हिंदु फेरीवाल्यांची संख्या हातावर मोजण्या इतपत असून काही विशिष्ट समाजाच्या लोकांसाठी महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून भूमिगत बाजार बांधले जाणार असल्याने खरोखरच याची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही विशिष्ट समाजाची माणसे ही केवळ जागा अडवून आपल्या समाजाच्या लोकांना व्यवसाय करण्यास देत आहेत. त्यातून त्या समाजाचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे या समाजासाठी भूमिगत बाजाराची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Hawkers In Andheri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.