महिंद्रांच्या ‘या’ निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मिळणार ‘आनंद’!

81

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयी देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परदेशी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षणाच्या देशांतर्गत चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठटी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : Russia Ukraine War: कीवमधील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी )

वैद्यकीय महाविद्यालय

भारतात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत दिली आहे. भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे याची मला कल्पना नव्हती. आपण मेडिकलच्या अभ्यासासाठी महिंद्रा कॅम्पसमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू शकतो का असा प्रश्न ट्वीटमध्ये करत आनंद महिंद्रा यांनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना त्यांनी टॅग केले आहे.

मायदेशातून शिक्षण

युक्रेनमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम भारताच्या तुलनेत अगदी स्वस्त आहे. भारतात खाजगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची पदवी संपादन करण्यासाठी एका विद्यार्थ्यामागे जवळजवळ 1 करोड रुपयांचा खर्च करावा लागतो. याच्या तुलनेत युक्रेनमध्ये हाच अभ्यासक्रम 22 ते 25 लाख रुपयात पूर्ण करता येतो. भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी जागाही मर्यादित आहेत. त्यामुळे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि भविष्याच विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशातच शिक्षण घेता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.