आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा; अग्निवीर युवकांना नोकरीची देणार संधी

भारतीय सैन्यात अग्निपथ योजनेतून भरती करण्यात येणार आहे. भरती होणा-या युवकांना अग्निवीर असं संबोधले जाणार. पण ही नियुक्ती चार वर्षांसाठी असल्याने आंदोलनाला काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. आता याच आंदोलनामुळे व्यथित झालेले उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मोठी घोषणा करत अग्निवीरांना आपल्या कंपनीत नोकरीची संधी देणार असल्याचे ट्वीट करत म्हटले आहे.

उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करुन म्हटले की, अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्यापद्धतीने हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळए दु:खी आणि निराश झालो आहे. मागील वर्षीदेखील या योजनेवर विचार करण्यात आला तेव्हा, या योजनेमुळे शिस्त आणि कौशल्य असलेले अग्निवीर उपलब्ध होतील. हे अग्निवीर अधिक रोजगार सक्षम होतील असे मी म्हटले होते. आता, या अग्निवीर युवकांना आम्ही नोकरीची संधी देणार असल्याची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली.

( हेही वाचा: मोठी बातमी! मलिक आणि देशमुख यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी परवानगी मिळणार? )

कोणती नोकरी देणार?

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर, काही युजर्सकडून अग्निवीरांना कोणती नोकरी देण्यात येणार, असा प्रश्न केला. यावर त्यांनी काॅर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व कौशल्य, टीम वर्क आणि शारिरिक प्रशिक्षण यामुळे अग्निवीरांच्या रुपाने उद्योगजगताला व्यावसायिक मनुष्यबळ मिळेल, असे म्हटले आहे. या व्यक्ती प्रशासन, सप्लाय चेन व्यवस्थापन आदींमध्ये काम करु शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here