आनंदवन कंटेनमेंट झोन! २४८ जण कोरोनाबाधित! 

आनंदवनात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सार्वधिक आहे. तसेच त्यातील अनेकांना विविध आजार जडले आहेत. ते सर्व जण इथे एकत्र राहतात. 

समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचे सन्मान्य जगणे जगता यावे, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आपले उभे आयुष्य झिजवले आणि आनंदवन आश्रम उभारला. सध्या इथे १ हजार ७३० जण राहतात. मात्र आता या आनंदवनाला कोरोनाचा विळखा पडला आहे. इथे दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आनंदवनला आता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे, अशी माहिती तेथील तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

तातडीने आनंदवनात उभारले आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटर!

प्रशासनाला जेव्हा आनंदवनात राहणारे नागरिक आजारी पडले आहेत, अशी माहिती मिळाली तेव्हा प्रशासनाने तातडीने १ मार्च रोजी आनंदवनात आरोग्य पथक पाठवले. त्यांनी तेथील नागरिकांची कोरोना चाचणी केली असता २० जण कोरोनाबाधित सापडले. त्यानंतर मात्र प्रशासनाची झोप उडाली. ताबडतोब प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार बेडसे यांनी तातडीने बैठक घेऊन आनंदवनातील सर्व स्थिती जिल्ह्याधिकाऱ्यांना कळवली. तसेच आनंदवन येथेच आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी केली. त्याप्रमाणे तातडीने या ठिकाणी हे सेंटर सुरु करण्यात आले आणि २ मार्चपासून दररोज कोरोना चाचण्या सुरु झाल्या.

आनंदवनात विविध आजार जडलेले सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक! 

आनंदवनात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सार्वधिक आहे. तसेच त्यातील अनेकांना विविध आजार जडले आहेत. त्यांचे आरोग्य स्वास्थ्य कायम बिघडलेले असते. विशेष म्हणजे या ठिकाणी २००-२०० जण एकत्र राहतात, एकत्र जेवतात. अशा प्रकारे हे सर्व जण कायम एकमेकांच्या संपर्कात येत असतात. परिणामी या ठिकाणी कोरोनाचा प्रसार जलद गतीने होऊ लागला आहे, अशी बाब प्रशासनाला लक्षात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ संपूर्ण आनंदवन परिसर हा सील केला असून  कंटेनमेंट  झोन म्हणून घोषित केला आहे.

आनंदवनातच उभारले कोरोना रुग्णालय! 

त्याचबरोबर प्रशासनाने आता आनंदवन येथेच कोरोना रुग्णालय उभारले आहे. म्हणून येथील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेण्याची गरज भासत नाही. तेथेच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. या ठिकाणी राहणारे कुष्ठरोगी सर्वाधिक आहेत, त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी सेवेकऱ्यांची संख्या जास्त आहे. अशाप्रकारे इथे एकूण १ हजार ७३० जण राहत आहेत.

लसीकरणही झाले सुरु! 

मागील चार दिवसांपासून आनंदवनात जे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यावर उपचार केले जातातच, शिवाय त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसही दिली जात आहे. त्यामुळे रुग्णांची रिकव्हरी लगेच होत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत या ठिकाणी १३० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना वरॊरो येथील लसीकरण केंद्रावर आणले जात आहे.

काय आहेत सध्याची स्थिती? 

  • आतापर्यंत आनंदवनात ९४७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
  • २४८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
  • त्यातील २५ जण बरे झाले आहेत.
  • तर २२३ जणांवर उपचार सुरु आहेत.
  • सुदैवाने अजून एकाचाही मृत्यू झाला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here