आसामच्या (Assam) श्री भूमी जिल्ह्यामध्ये हनुमंताचे प्राचीन मंदिर (Hanuman Temple) आढळले आहे. मंदिर आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी आता ते मंदिर जतन करणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पाथरकांडीतील (Patharkandi) बिरबारीमधील लंगाई नदीजवळ उत्खननादरम्यान हे मंदिर सापडले आहे. मंदिरामागे हनुमान चालीसा लिखीत स्वरूपात कोरलेली दिसत आहे.
( हेही वाचा : katraj snake park lake : १३ फूट लांब किंग कोब्रा पाहायचा असेल तर कात्रज स्नेक पार्कला अवश्य भेट द्या!.)
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परिसरामध्ये भाविकांनी पुढाकार घेतला असून, अनिल सिंग (Anil Singh) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या हनुमंताच्या मंदिरासाठी (Hanuman Temple) भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करणाऱ्या सागर सिन्हा (Sagar Sinha) यांनी अर्थिक मदत केली आहे. मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी दीड लाखांची मदत त्यांनी केल्याची माहिती आहे. मंदिराची पुनर्बांधणी केल्यानंतर, भक्तांसाठी मंदिर एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र बनेल अशी अपेक्षा आहे. (Assam)
उत्खननात सापडलेले हे मंदिर (Hanuman Temple) हजारो वर्षे प्राचीन असून काही कारणामुळे ते मातीत गाडले गेले होते. घराच्या बांधकामासाठी उत्खनन करत असताना मंदिराची संपूर्ण रचना सापडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यात स्थानिकांना मंदिराचा काही भाग आढळला असून त्याचे जतन केले जाणार आहे. (Assam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community