Andheri Fire: अंधेरीत इमारतीला लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

149
मुंबईतील अंधेरी (Andheri Fire) पश्चिम येथील एक बहुमजली निवासी इमारतीच्या 11व्या मजल्यावर सोमवारी रात्री 10 च्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीला आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत एका वृद्धासह दोन जण जखमी झाले आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. (Andheri Fire)
इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, आग लागताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दल 15 मिनिटांत पोहोचले आणि आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवण्यात आले. या अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्याला अग्निशमन दल (fire brigade) आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने जवळच्या कोकिळाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 10 वाजता ओबेरॉय कॉम्प्लेक्समधील (Oberoi Complex Fire) 13 मजली स्काय पॅन बिल्डिंगच्या 11व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये आग लागली. मंगळवारी रात्री 1.49 वाजता सुमारे चार तासांनंतर आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – कुख्यात डॉन Dawood Ibrahim चा सहकारी इकबाल मिर्ची याची मालमत्ता ईडीकडून जप्त)

या अपघातात एक वृद्धासह आणखी एक व्यक्ती असे दोघे गंभीर जखमी झाले. मात्र त्यांच्यापैकी 75 वर्षीय वृद्ध इसम राहुल मिश्रा (Rahul Mishra) यांचे निधन झाले. तर रौनक मिश्रा ( वय 38) याची प्रकृती आता ठीक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.