Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?

1248
Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?
Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?
  • सचिन धानजी,मुंबई

एमएमआरडीएकडून ताब्यात आलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर  काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील उड्डाणपुलावरील (Andheri Flyover) शॉपिंग सेंटर करता बांधलेल्या बांधकामाचा भाग कोसळला. मात्र, हे पूल वाहतुकीस सुस्थितीत असून केवळ अंतर्गत शॉपिंग सेंटरकरता बांधलेल्या गाळ्यांचे स्लॅब पडल्याने भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान,एमएमआरडीएच्या कडून हा मार्ग ताब्यात आल्याने या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करायला निघाली आहे. परंतु आता धक्कादायक माहिती समोर येत असून या पुलाचा ताबा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. एवढेच काय तर या पुलाचा ताबा एमएमआरडीएकडेही (MMRDA) नसून या पुलाचे बांधकाम करणाऱ्या जोग कंपनीने अद्यापही हे पूल हस्तांतरीत न केल्यामुळे आजही हे पूल अधांतरीच लटकलेले आहे. त्यामुळे या पुलावर अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. (Andheri Flyover)

(हेही वाचा- Pune News : पुण्यावर रात्रीच्या वेळी ड्रोनची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?)

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व येथील गुंदवली रस्ते पुलाखाली एका कारवर बांधकामाचा भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, पण कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अंधेरी पूर्व येथील हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात होता. त्यानंतर  तो एमएमआरडीएच्या (MMRDA) ताब्यात देण्यात आला होता आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून या पुलाची देखभाल केली जात होती. परंतु डिसेंबर २०२२मध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले. (Andheri Flyover)

अंधेरी येथील हा पूल युती सरकारच्या काळात बांधण्यात आला होता. बांधा,वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधण्यात आलेला हा पहिला पूल असून ज्यामध्ये पुलाच्या खालील बाजुस शॉपिंग सेंटरची संकल्पना होती. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा या मार्गावरील मोठा पूल जोग कंपनीने बांधल्यानंतर त्यांना शॉपिंग सेंटरची संकल्पना पूर्णत्वास नेता आली नाही. त्यामुळे हे पूल केवळ वाहतुकीसाठीच सुरु झाले. मात्र, या पुलाचा ताबा जोग कंपनीकडे असल्याने त्यांनी ते महाराष्ट्र रस्ते विकास महामडळाला हस्तांतरीत करणे आवश्यक होते.  परंतु पुलाची देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून आधी एमएसआरडीसीने या पुलाच्या देखभालीची जबाबदारी घेतली, त्यानंतर पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीच्या ताब्यात दिल्यामुळे या पुलाची जबाबदारी त्यांच्या एमएसआरडीसीने सुपूर्त केली. त्यामुळे पुन्हा हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत करताना या पूलाची जबाबदारीही महापालिकेकडे (Municipal Corporation) आली. (Andheri Flyover)

(हेही वाचा- CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार)

मात्र, या पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएने (MMRDA) महापालिकेकडे हस्तांतरीत केला असला तरी या अंधेरी पूर्व येथील पुलाच्या हस्तांतरणाची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नाही. महापालिकेच्या माध्यमातून एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून या पुलाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली जात आहे. परंतु याबाबत कोणतीही कागदोपत्री माहितीच एमएमआरडीएकडे नसल्याची बाब समोर येत आहे. (Andheri Flyover)

या पुलाचे बांधकाम बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर असल्याने या पुलाचे हस्तांतरण आधीच एमएसआरडीसीला झालेले नाही, त्यामुळे ते एमएमआरडीएलाही (MMRDA) झालेले नाही. त्यामुळे ज्या पुलाचे हस्तांतरण होऊन हे पुल महापालिकेच्या ताब्यात आलेले नसतानाच या पुलाचा स्लॅब पडल्याने याची जबाबदारी कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, एका बाजुला हे पुल ताब्यातच आलेले नसताना महापालिकेच्यावतीने काही कंत्राटदार कंपनीला डोळयासमोर १०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याच्या दृष्टीकोनातून निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. (Andheri Flyover)

(हेही वाचा- Telangana पोलिसांकडून Nashik मध्ये गांजातस्करी प्रकरणी महिला नेत्याला अटक)

विशेष म्हणजे सव्वा वर्षांपूर्वी महापालिकेने (Municipal Corporation) आपल्या ताब्यात घेतलेल्या या पूलासाठीचा खर्चच सुमारे १०० कोटींच्या घरात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मागील काही काळात एमएमआरडीएने या पुलाच्या दुरुस्तीसाठी काहीच खर्च नसल्याचे स्पष्ट होते. एमएमआरडीएन  फेब्रुवारी २००४मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गवरील अंधेरी उड्डणपूल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामांसाठी सुमारे २४ कोटी रुपयंचा खर्च केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हा खर्च केल्यानंतर सातत्याने एमएमआरडीएने डांबरीकरणाची कामे केलेली आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीवर कोणत्याही प्रकारचा खर्च केलेला नाही. (Andheri Flyover)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.