आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh Train Accident) विजयनगरम जिल्ह्यात काल म्हणजेच रविवार २९ ऑक्टोबर रोजी रात्री २ रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. विशाखापट्टणम-रगडा पॅसेंजर विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला मागून धडकली. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कांकटपल्ली दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, (Andhra Pradesh Train Accident) विशाखापट्टणम-रगडा पॅसेंजर आणि विशाखापट्टणम-पलासा पॅसेंज या दोन्ही रेल्वेंची टक्कर झाली आहे. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले की बचाव कार्य सुरू आहे, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला मदत आणि रुग्णवाहिकेसाठी कळविण्यात आले आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
#WATCH | Andhra Pradesh train accident: Rescue operations continue in Vizianagaram district.
“As per the data, 9 casualties are there and 29 people have been injured…,” says Biswajit Sahu, CPRO, East Coast Railway. pic.twitter.com/N3adqmASxx
— ANI (@ANI) October 29, 2023
(हेही वाचा – Onion Price : कांदा पुन्हा रडवणार)
मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मदत (Andhra Pradesh Train Accident) कार्यासाठी सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. रुग्णवाहिका आणि इतर महत्त्वाच्या वस्तू घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वेने मदतीसाठी 8912746330, 8912744619, 8106053051, 8106053052, 8500041670 आणि 8500041671 हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community