Android वापरकर्ते सावधान! तातडीने डिलीट करा हे 8 डेंजर अ‍ॅप्स

Android स्मार्टफोन वापरणा-यांना 8 धोकादायक अ‍ॅप्स तातडीने डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुगलनेही हे 8 अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहेत.

मालवेअर ऑटोलिकोस

फ्रेंच सुरक्षा संशोधक मॅक्सिम इंग्राओ यांनी सर्वप्रथम 8 धोकादायक अ‍ॅप्सची सूचना दिली. या अ‍ॅप्समध्ये नवीन प्रकारचा मालवेअर लपलेला आहे. त्यांनी या मालवेअरला ऑटोलिकोस असे नाव दिले आहे.

प्ले स्टोअरवरुन हटवले असले तरी…

गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवले असले तरी, हे अ‍ॅप्स डाउनलोड केलेल्या युजर्सच्या स्मार्टफोनवर अजूनही असतील. तसेच, अ‍ॅप्सच्या एपीके आवृत्या अजूनही गुगलवर उपलब्ध आहेत.

( हेही वाचा: GST on Room Rent: घरभाड्यावर कोणाला भरावा लागणार 18 टक्के GST; जाणून घ्या सविस्तर )

हे आहेत 8 अ‍ॅप्स 

 • ब्लाॅग स्टार व्हिडिओ एडिटर.
 • क्रिएटिव्ह 3डी लाॅंचर.
 • फनी कॅमेरा.
 • वाव ब्यूटी कॅमेरा.
 • जीआयएफ इमोजी कीबोर्ड.
 • रेझर कीबोर्ड आणि थीम.
 • फ्रीग्लो कॅमेरा 1.0.0
 • कोको कॅमेरा व्ही 1.1

धोका काय?

 • हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय स्मार्टफोनमधील प्रिमियम सेवेचे सदस्यत्व घेतात.
 • तसेच, एसएमएस वाचवण्यासाठी परवानगी मागतात. त्यानंतर ते ओटीपीसारख्या गोष्टी चोरुन यूजरचे पैसे लुटतात.
 • या मालवेअर अ‍ॅप्सचा प्रचार करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी अनेक फेक फेसबुक पेजेस तयार केले आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही जाहिराती चालवल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here