पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये दिला जाणाऱ्या पोषण आहारात मृत बेडकाचे पिल्लू (Dead Frog Anganwadi Nutrition) आढळून आले आहेत. संबंधित घटना ही कासेगावच्या भुसेनगरमध्ये (Kasegaon Bhusenagar) घडली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून, शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय असा सवाल देखील पालकांनी उपस्थित केला आहे. (Anganwadi nutrition)
शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेला किडा आढळला होता. (Anganwadi nutrition)
(हेही वाचा – Bihar Politics : नितीश कुमार यांचा वारसदार खरंच ठरला आहे का?)
परंतु, त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता. म्हणजे हे बेडकाचे पिल्लू किती महिन्यांपूर्वी मरुन पडले असेल याचा विचार न केलेलाच बरा आहे. शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.(Anganwadi nutrition)
(हेही वाचा – Bihar Politics : नितीश कुमार यांचा वारसदार खरंच ठरला आहे का?)
ठेकेदारावर करवाई करण्याची मागणी
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने कोणतेही खंबीर पाऊल उचलले नसले तरी प्रशासन कामाला लागले आहे. ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरले असून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. (Anganwadi nutrition)
हेही पाहा –