झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये (एसआरए) आता अंगणवाड्यांना जागा मिळणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. अंधेरी पूर्व येथील ‘के ईस्ट’ विभागात झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री लोढा म्हणाले की, या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या भितींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी उपलब्ध करून द्यावा. रस्ता बांधकामावेळी ज्यांचे घर तोडले जात असेल, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. शासनामार्फत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या तक्रारीवर तातडीने निर्णय घ्यावा. शासकीय सामुग्रीची चोरी होत असलेल्या भागात सीसीटीव्ही बसवावेत व नुकसानग्रस्त भागाची दुरूस्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
(हेही वाचा हात-पाय तोडले तरी पुन्हा ‘आफताब’सोबत गेली आणि…, शरीराचे 35 तुकडे झालेल्या मुलीच्या हत्येची सत्यकथा)
३४६ तक्रारी
स्थनिक नागरिकांच्या विविध ३४६ विषयासंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अधिका-यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना लोढा यांनी यावेळी दिल्या. ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रार करण्यासाठी portal.mcgm.gov.in या लिंकचा वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Join Our WhatsApp Community