हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना रशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी

217
हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना राशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी
हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना राशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी

मुस्लिम धर्मगुरु आणि ऑल इंडिया इमाम असोसिएशनचा अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी याने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रशिदी याने एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू देवींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज (Aniket Shastri Maharaj) यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अखिल भारतीय संत समितीद्वारे (Akhil Bhartiya Sant Samiti) नाशिक रोड येथील पोलिस निरीक्षकांना त्यांनी पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. (Aniket Shastri Maharaj )

( हेही वाचा : Rohit Sharma : रोहितच्या नवीन बाळाचं नाव आलं समोर, रितिकाने केली इन्स्टाग्राम पोस्ट

महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मुस्लिम धर्मगुरु मौलाना साजिद रशिदी याने अत्यंत घृणास्पद विधान केले आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून धर्मगुरु म्हणून अतिशय वेदना होत आहेत. त्यामुळे भारतासारख्या समृद्ध देशात हा वाचाळवीर असे विधान कसे करू शकतो, असा प्रश्न निर्माण होतो. वाचाळवीर मौलाना साजिद रशिदी (Maulana Sajid Rashidi) म्हणतो, ‘समस्त हिंदू हे देवींची पूजा करतात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात’ असे हे घृणास्पद वक्तव्य मौलानाने केले आहे. या मौलानावर राज्य आणि केंद्र सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच समस्त हिंदूंची या मौलानाने माफी मागावी. जेणेकरून कोणीही हिंदूच्या देवीदेवतांबद्दल अशी विधान करू नये, असे विधान डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी केले आहे. (Aniket Shastri Maharaj )

दरम्यान तथाकथित मौलाना रशिदी याला भारत देशातील शातंता भंग करायची आहे का? दोन्ही समाजामध्ये या मौलाना साजिद रशिदी याला भांडणे लावायची आहेत का? दंगली घडवायच्या आहेत का? असा माझा हिंदू (Hindu) धर्म गुरु म्हणून समस्त हिंदू (Hindu) समुदायाच्या वतीने प्रश्न आहे, असेही डॉ. अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले. तसेच हिंदूंच्या भावना लक्षात घेत या प्रकरणाची कठोर चौकशी करून सरकारने साजिद रशिदी याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती महाराजांनी केली. त्याचबरोबर अटक न झाल्यास आम्ही संत समाज उपोषणाला बसू, असे ही डॉ. अनिकेतशास्त्री महाराज (Aniket Shastri Maharaj) म्हणाले. त्यातच रशिदी याला अटक होणार असल्याची माहिती काही वृत्तसंस्थानी दिली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.