- ऋजुता लुकतुके
एका बाजूला उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं साम्राज्य वाढताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या व्यवसायाला फटका बसत असल्याचं चित्र दिसत होतं. कारण दिवसेंदिवस व्यवसायावर कर्जाचा बोजा वाढत असून, कंपन्यांचा नफा घटला आहे. त्यामुळं मोठा आर्थिक फटका त्यांच्या व्यवसायाला बसत आहे. पण आता अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासाठी त्यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) आशेचा किरण ठरत आहेत. जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) आता व्यवसायाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतायेत. त्यांच्या अविरत कष्टातून त्यांनी २,००० कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. (Anil Ambani)
अंबानी कुटुंबाची पुढची पिढी आता नेतृत्व करत असल्याचे दिसत आहे. संकटात सापडलेल्या व्यवसायाला बाहेर काढत आहे. कोणत्याही प्रसिद्धीच्या झगमटात न राहता जय अंबानी हे वडिलांचा गेलेले साम्राज्य पुन्हा मिळवून देण्यासाठी राबत आहेत. (Anil Ambani)
(हेही वाचा- Pune : राज्यात २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ)
जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) यांच्यावर आता व्यवसाय पुढे नेण्याची धुरा आहे. जय अनमोल (Jai Anmol Ambani) यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच करिअरला सुरुवात केली. त्यांनी रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये इंटर्न म्हणून व्यवसायाला सुरुवात केली. २०१४ मध्ये त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. आज ते हळूहळू कंपनीचं साम्राज्य वाढवत आहेत. रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये इंटर्न म्हणून काम केल्यानंतर काही काळानंतर ते रिलायन्स निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट (Reliance Nippon Asset) आणि रिलायन्स होम फायनान्सचे (Reliance Home Finance) सदस्य झाले. ज्यावेळी अनिल अंबानी (Anil Ambani) या कंपन्यांचे सदस्य झाले, त्यावेळी या कंपन्यांच स्थिती फार बिकट होती. कंपनीवर कर्जाचा बोजा वाढला होता. तसेच कंपनीच्या नफ्यात मोठी घट देखील झाली होती. पण अशा काळात जय अनमोल अंबानी यांनी मोठ्या हिंमतीनं आपला व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निप्पॉन या जपानी कंपनीला रिलायन्समधील भागीदारी वाढवण्यास भाग पाडले. याच काळात रिलायन्स लाइफ इन्शुरन्स आणि रिलायन्स कॅपिटल ॲसेट मॅनेजमेंट या कंपन्यांची सुरुवात देखील झाली. जय अनमोल अंबानी यांनी आता पूर्णत: व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळं संकटात असलेला व्यवसाय पुन्हा प्रगती करण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. (Anil Ambani)
(हेही वाचा- Taiwan Earthquake: तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा जोरदार भूकंपाचा धक्का, जपानला त्सुनामीचा इशारा)
जय अनमोल अंबानी आता योग्य नियोजन आणि कष्टातून व्यवसायाला अक नवीन दिशा देत आहेत. कष्टातून त्यांनी २,००० कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. २०२२ मध्ये जय यांचे क्रिशा शाहसोबत लग्न झालं होतं. ते कधीच प्रसिद्धीच्या झोतात नसतात. उद्योगपती मुकेश अंबानींच्या अनंत आणि आकाश या मुलांच्या तुलनेत जय अनमोल यांनी व्यवसायिक जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. वडिलांचं गेलेलं साम्राज्य पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. (Anil Ambani)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community