सीताराम कुंटेंच्या कबुलीने अनिल देशमुख का आले अडचणीत?

126

शंभर कोटी वसुलीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी याद्या पाठवल्याची माहिती कुंटे यांनी ईडीला दिल्याचे समोर आले आहे.

काय म्हणाले कुंटे?

१०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात देशमुख सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. ‘ईडी’कडून १०० कोटींच्या वसूली प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ रोजी ‘ईडी’कडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा सैन्याची परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये संताप! ट्विटरवर #JusticeForArmyStudents ट्रेंड होतोय)

अनिल देशमुख आणि परब यांचे रॅकेट

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारने पोलीस बदल्यांच्या माध्यमातून वसुलीचा धंदा चालवल्याची जळजळीत टीका केली. त्यांनी शनिवारी ट्विट करुन म्हटले की, अनिल देशमुख आणि शिवसेनेचे अनिल परब हे दोघे पोलीस बदल्यांच्या रॅकेटचे सूत्रधार होते. देशमुख आणि परब कोट्यवधी रुपये घेऊन पोलीस बदल्यांची अंतिम यादी तयार करायचे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.