Animal Cemetery : देवनारमध्येही मार्चपासून सुरु होणार जनावरांची शवदाहिनी

353
Animal Cemetery : देवनारमध्येही मार्चपासून सुरु होणार जनावरांची शवदाहिनी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील पाळीव आणि भटक्या जनावरांवर शास्त्रोक्तपणे अंत्यसंस्कार करता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने मालाडमध्ये पहिली जनवरांसाठी स्मशानभूमी तयार करण्यात आल्यानंतर आता देवनारमधील शवदाहिनी उभारण्यात येत आहे. या जनावरांच्या शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यांत जनावरांवर अंतिम संस्कार करण्यासाठी या शवदाहिनीचे लोकार्पण केले जाणार आहे. (Animal Cemetery)

मालाड येथील जनावरांच्या शवदाहिनीचे लोकापण सप्टेंबर २०२३ मध्ये करण्यात आले असून आतापर्यंत याठिकाणी २२७५ जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. याठिकाणी आतापर्यंत पाळीव कुत्रे १३२, भटके कुत्रे ११२७, मांजरी ९६९ आणि इतर पशुपक्षी ४७ आदींचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. देशातील ही पहिली पीएनजीवर आधारित जनावरांसाठी असलेली शवदाहिनी आहे. (Animal Cemetery)

(हेही वाचा – संक्रमण गाळे वाटपाच्या सुनावणीला त्यापैकी एकही अर्जदार राहिला नाही उपस्थित; MHADA ने दिली पुन्हा संधी!)

मालाडबरोरबच महापालिकेच्यावतीने देवनारमध्येही जनावरांच्या शवदाहिनीचे काम हाती घेतले होते, याचे काम सध्या सुरु आहे. हे काम मार्च महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे मार्च अखेर किंवा एप्रिल महिन्यांत याचे लोकार्पण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त विशेष चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलिमपाशा पठाण यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प साकारला जात आहे. (Animal Cemetery)

देवनार येथील पशुवधगृहाच्या जागेतच ३०० चौरस मीटरच्या जागेतच जनावरांसाठी शवदाहिनी तयार केली जात असून सर्व प्रकारची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे पीएनजीची मंजुरी आणि जोडणी प्रक्रीया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च महिना अखेरपर्यंत याचे लोकार्पण केले जाणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तासाला ५०० किलोग्रॅम इंधनाचा वापर होणार असून याठिकाणी पाळीव तसेच भटके कुत्रे, मांजर, कबुतर, कावळे तसेच इतर मृत जनावरांवर याठिकाणी विल्हेवाट लावली जाणार आहे. (Animal Cemetery)

(हेही वाचा – सरकारी योजना चालवण्यासाठी हिमाचलमधील Congress Government चा मंदिरांच्या पैशावर डोळा)

याठिकाणच्या शवदाहिनीतील अंत्यसंस्कार हे मोफत केले जाणार असले तरी प्रत्येक जनावराची नोंदणी असणे आवश्यक असेल. त्यामुळे पाळीव कुत्रे आणि मांजर प्रेमींनी आपल्या कडील जनावराची नोंदणी करणे बंधनकारक असेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकप्रकारे पर्यावरण पुरक अशी व्यवस्था पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरांतही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Animal Cemetery)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.