Anniversary of 26/11 Terror: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी निरपराध आणि नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार केला होता.

161
Anniversary of 26/11 terror: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली
Anniversary of 26/11 terror: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा (Anniversary of 26/11 terror) झालेल्या जवानांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली.

या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात बांधण्यात आलेल्या पोलीस स्मारकाला राज्यपाल बैस, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई पोलीस दलाचे नुकसान कधीच भरून निघणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Loksabha Election 2024: जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, फडणवीसांनी सांगितला आकडा)

निरपराध आणि नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार
१५ वर्षांपूर्वी २६/११ च्या रात्री लष्कर-ए-तोएबाच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता. दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी निरपराध आणि नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार केला होता. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३००हून अधिक लोक जखमी झाले होते. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

मुंबई पोलिसांना लष्कराची मदत
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मुंबई पोलिसांना लष्कराची मदत घ्यावी लागली. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारीही शहीद झाले होते. 2012 मध्ये एका खटल्यानंतर फाशी देण्यात आलेल्या अजमल आमीर कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आमच्या सुरक्षा दलांना यश आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.