Atal Setu ची वर्षपूर्ती; वर्षाला धावली ८२ लाखांहून अधिक वाहने…

44

मुंबई ते नवी मुंबई (Travel from Mumbai to Navi Mumbai) प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूमुळे (Shivdi-Nhavasheva Sea Bridge) शक्य झाले आहे. हा सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन सोमवार, १३ जानेवारी रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या सागरी सेतूचे १३ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, वर्षभरात अटल सेतूवरून (Atal Setu)  ८२ लाख ८१ हजार ५२४ वाहने घावली आहेत. दिवसाला ७० हजार वाहने या सागरी सेतूवरून धावणे अपेक्षित असताना वर्षभरात दिवसाला सरासरी २२५०० वाहनांनी अटल सेतूवरून प्रवास केला आहे. (Atal Setu)

एका वर्षाच्या कालावधीत धावलेल्या एकूण ८२ लाख ८१ हजार ५२४ वाहनांमध्ये चारचाकी हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक, ७७ लाख ५ हजार ४९७ अशी आहे. मिनीबस, हलक्या व्यावसायिक वाहनांची संख्या ९९ हजार ३५६, बस, ट्रकची संख्या १ लाख १७ हजार ४१४, अवजड वाहनांची संख्या ८९८ तर उर्वरित वाहनांची संख्या ३ लाख ५८ हजार ३५९ अशी आहे. या वाहनांच्या माध्यमातून सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आतापर्यंत नऊ कोटींहून अधिक रकमेची पथकर वसुली झाली आहे.

(हेही वाचा – Z Morh Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींनी केले झेड मोड बोगद्याचे उद्घाटन; १ तासाचे अंतर १५ मिनिटांत कापता येणार)

अटल सेतूवरील पथकर (Atal Setu Tolltax) आणि वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफी यामुळे अटल सेतूकडे वाहनांचा कल कमी असल्याचे सांगितले जात आहे. वाहनांची संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने पथकर कमी करावा, अशी मागणी सर्वसामान्यांची आहे. पण सागरी सेतूसाठी १७ हजार कोटींचा खर्च आला असून हा खर्च वसूल करण्यासाठी पथकर शुल्क आहे तसेच ठेवणे गरजेचे असल्याचे ‘MMRDA’चे म्हणणे आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.