मुंबई अग्निशमन दलात आणखी एक ७० मीटर उंचीची शिडी!

उंच इमारतींमधील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे २५ मीटर ते ९० मीटर उंचीच्या शिड्या असलेली वाहने आहेत. आपत्कालिन परिस्थितीत ही वाहने आपली उपयुक्तता सिध्द करतात.

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी उत्तुंग इमारतींमधील आग विझवण्यास मदत ठरणाऱ्या ७० मीटर उंचीचे हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार आहे. यासाठी पाच वर्षांच्या देखभालीसह या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची खरेदी सुमारे १६ कोटी रुपयांना केली जाणार आहे. विशेष म्हणजे अशा ७० मीटर उंचीचे हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वाहने ही मरोळ, विक्रोळी आणि मानखुर्द येथील समादेश केंद्रावर नसल्याने त्या परिसरात आगीची दुर्घटना घडल्यास नरीमन पॉईंट, बोरीवली आणि भायखळा आदी अग्निशमन केंद्रातून पाठवले जातात.

(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)

मुंबई अग्निशमन दलाची मुंबईत ३५ अग्निशमन केंद्र असून १७ छोटी अग्निशमन केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर २५० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा आहे. परंतु मागील काही दशकांपासून शहराची वाढ झपाट्याने होवून उत्तुंग इमारतींच्या संख्येतही वाढ झाली आहे. आडवी असणारी मुंबई आता आकाशाच्या दिशेने उंचच उंच झेप घेत असताना अशा उत्तुंग इमारतींमधील आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना जिकरीचे होत आहे.

अशी होणार खरेदी!

उंच इमारतींमधील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे २५ मीटर ते ९० मीटर उंचीच्या शिड्या असलेली वाहने आहेत. आपत्कालिन परिस्थितीत ही वाहने आपली उपयुक्तता सिध्द करतात. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यातील या वाहनांपैकी ७० मीटर, ८१ मीटर व ९० मीटर उंचीचे हायड्रोलिक प्लॅटफॉर्म हे नरीमन पॉईंट, बोरीवली व भायखळा येथील केंद्रावर आहेत. त्यामुळे ७० मीटर उंचीची नवीन हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टीम्स प्रायव्हेट यांची ब्रॉन्टो स्कायलिफ्ट, ओ वाय एबी फीन्लँड या कंपनीकडून सुमारे १५ कोटी रुपये आणि ब्रिजवासी कंपनीसोबत पुढील पाच वर्षांची देखभालीसाठी सव्वा दोन कोटी रुपये याप्रमाणे १७ कोटी रुपयांना ही ७० मीटर उंचीची लॅडर खरेदी केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here