येत्या गुरुवार पासून Gokhale Bridge वरील दुसरी पर्यायी मार्गिका होणार सुरू

1166
येत्या गुरुवार पासून Gokhale Bridge वरील दुसरी पर्यायी मार्गिका होणार सुरू

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून दोन्ही पूल जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. तसेच, या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका जोडण्‍यासंदर्भातील सर्व संरचनात्‍मक कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत. त्‍यानुसार, ‘नॉन डिस्‍ट्रक्‍टीव्‍ह’ आणि ‘क्‍यू’ या दोन महत्‍त्‍वपूर्ण चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या आहेत. दरम्यान, वाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधित अनुषंगिक कामे आणि चाचण्‍या पुढील दोन दिवसात पूर्ण केल्‍या जाणार आहेत. त्‍यानंतर म्‍हणजेच, गुरूवारी ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. (Gokhale Bridge)

(हेही वाचा – गोखले पूल बंद: पर्यायी ४० रस्ते आणि चौकांच्या मलमपट्टीवर सुमारे २४ कोटींचा खर्च)

दोन महिन्‍यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी गत दोन महिन्‍यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन सुरू होते. हे काम आव्‍हानात्‍मक असून देखील दिवस रात्र सुरू असल्‍यामुळे केवळ ७८ दिवसात पूर्ण झाले आहे. (Gokhale Bridge)

पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’

‘काँक्रिट क्यूरींग’च्या कामासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या क्यूरिंगसाठी उच्च दर्जाच्‍या काँक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात आली. पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आले आहे. (Gokhale Bridge)

(हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले पुलाची उंची बर्फीवाला उड्डाणपूल ३० जूनपर्यंत गाठणार!)

‘व्हिजेटीआय’ ने दिले ‘ना हरकत प्रमाणपत्र’

या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरली सेफ) असल्‍याचे ‘व्हिजेटीआय’ मार्फत घोषित करण्‍यात आले आहे. आवश्यक त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्‍याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ‘व्हिजेटीआय’ संस्‍थेने ३० जून २०२४ रोजी रात्री उशिरा महानगरपालिकेला दिले आहे. (Gokhale Bridge)

चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार

पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधित अनुषंंगिक कामे व चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पुढील दोन दिवसात पूर्ण केल्‍या जाणार आहे. यानंतर म्‍हणजेच, गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे. (Gokhale Bridge)

हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश, अवजड वाहनांसाठी बंदी

गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. (Gokhale Bridge)

(हेही वाचा – Gokhale Bridge : गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी ‘व्हीजेटीआय’ची मदत)

सी. डी. बर्फीवाला पूल सुस्थितीत स्थिर

सी. डी. बर्फीवाला या पुलासाठी देण्यात आलेला तात्पुरत्या स्वरूपाचा जॅकचा आधार काढण्यात आला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबांच्या आधारावर स्थित आणि सुस्थितीत असल्याची माहिती पूल विभागाने दिली आहे. तसेच पी ११ या खांबाच्या ठिकाणी पूल उचललेल्या ठिकाणी पुलास भक्कम आधार देण्यात आला आहे, याचाच अर्थ कोणताही तात्पुरता आधार पुलाला देण्यात आलेला नाही, असे महानगरपालिकेमार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलदगतीने सुरु आहे. हे काम पूर्ण करताना सी. डी. बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Gokhale Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.