महागाईचा आणखी एक फटका; LPG सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1 हजार 103 रुपयांवर पोहोचली आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचले आहेत.

एनआयए या वृ्त्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. 31, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2 हजार 119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 103 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर बुधवारपासून लागू झाले आहेत.

( हेही वाचा: होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेवर धावणार आणखी १० विशेष गाड्या )

‘असे’ आहेत 4 महानगरांमधील दर

  • दिल्लीत एलपीजीच्या किमती 1053 रुपयांवरुन 1103 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
  • मुंबईत एलपीजीच्या किंमत 1052.50 रुपयांवरुन 1102.50 रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचली आहे.
  • कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरुन 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे.
  • चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरुन 118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here