Pooja Khedkar यांचा आणखी एक उद्दामपणा; चोराला सोडविण्यासाठी अधिकाऱ्याला फोन

218
Pooja Khedkar Controversy : मनोरमा खेडकरनेही लोकसभा उमेदवारी अर्ज भरला होता, पण..

एका ट्विटमुळे आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. आता मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठविला असून यात पूजा यांनी डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे समोर येत आहे. एका चोराला सोडविण्यासाठी पूजा यांनी या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून दबाव टाकण्याचा प्रतत्न केल्याचे यात म्हटले आहे.

(हेही वाचा – Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!)

पूजा खेडकरांची ऑडी कार कोणाची?

१८ मे रोजी पनवेल पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते. तेव्हा पूजा यांनी कथितरित्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन केला आणि अटकेत असलेल्या ट्रान्सपोर्टर इश्वर उत्तरवाडे याला सोडण्यास सांगितले होते. पूजा खेडकर यांनी तो आरोपी निर्दोष असल्याचेही म्हणत त्याच्याविरोधातील आरोप किरकोळ असल्याचे पानसरेंना म्हटले होते.

पूजा यांनी फोनवर पानसरेंना आपली ओळख सांगितली. पानसरेंना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. यामुळे पोलिसांनी या कॉलवर कोणतीही कारवाई केली नव्हती. हा उत्तरवाडे आजही न्यायालयीन कोठडीत आहे.

मुख्य सचिवांना पाठवला अहवाल

पूजा खेडकर यांचे कारनामे उघड होऊ लागल्यावर पानसरे यांना या फोन कॉलची आठवण झाली. त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती दिली. त्या अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार पानसरेंनी कथित फोन कॉलवरून दोन पानांचा अहवाल मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पाठविला आहे. सौनिक यांच्याकडे सध्या गृह विभागाचा अतिरिक्त प्रभार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.