प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) गुरुवार, ३० जानेवारीला दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ मधील घडलेल्या दुर्घटनेत 15 तंबू जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने तातडीने आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.
यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू जळून खाक झाले होते. सिलिंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली होती. आगीच्या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा (Mahakumbh) परिसरात उपस्थित होते. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाकुंभमेळा परिसर ३५० हून अधिक अग्निशमन दल, २००० हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ, ५० अग्निशमन केंद्रे आणि २० अग्निशमन चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा Kumbh Mela Stampede : दुर्घटनेनंतर सरकारने उचलली पावले, VIP पास रद्द, वाहनांना प्रवेशबंदी)
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला महाकुंभ मेळा परिसराचा आढावा घेतला. हा संपूर्ण परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच व्हीव्हीआयपी पास देखील रद्द करण्यात आले आहेत. शहरात चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे. प्रयागराज महाकुंभातील (Mahakumbh) संगम नदीच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आणि भाविकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
Join Our WhatsApp Community