शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाल्यानंतर या पक्षातील नगरसेवकही आता बाहेर पडू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेविका धनश्री भरडकर, रेश्मा बानो वकील शेख यांच्यानंतर आता ज्योती हारुन खान (Jyoti Harun Khan) आणि माजी नगरसेवक हारुन खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत एकूण ९ नगरसेवक निवडून आले होते आणि त्यापैंकी आतापर्यंत तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेते असलेल्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी दोन माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ९ नगरसेवक सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले होते, यापैंकी सोफिया नाझिया या जात पडताळणीमध्ये अपात्र ठरल्या होत्या. मार्च महिन्यामध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. (Shiv Sena)
परंतु एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट बाहेर पडल्यानंतर त्यांना संख्याबळानुसार निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्यात आले आहे, तर शिवसेनेचे यापूर्वीचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना (UBT) असे नाव देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोरेगाव मालाडमधील माजी नगरसेविका धनश्री भरडकर, धारावीतील माजी नगरसेविका रेश्मा बानो शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर आता विक्राळी पार्क साईट परिसराती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका ज्योती हारुन खान (Jyoti Harun Khan) आणि माजी नगरसेवक हारुन खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. (Shiv Sena)
(हेही वाचा – Pune : पुण्यात भरले शिवकालीन सुवर्णमुद्रा दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन)
ज्योती हारुन खान (Jyoti Harun Khan) या प्रभाग क्रमांक १२४ मधून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी हारुन खान (Harun Khan) हे सन २०१७ पर्यंत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्यप्रकारे सन्मान मिळत नसल्याने तसेच वरिष्ठांकडून मिळत असलेल्या वर्तनाला कंटाळून त्यांनी सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे काम केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील तत्कालिन गटनेत्या राखी जाधव यांच्याकडून त्यांना योग्यप्रकारे वागणूक मिळत नव्हती. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीच्या वाटपातही त्यांना मग डावलले गेले होते. हारुन खान हे शिवसेनेत गेले असले तरी ज्योती हारुन खान या राष्ट्रवादी पक्षातच होत्या. परंतु पती शिवसेनेत गेल्याने ज्योती खान यांना पक्षात विशेष महत्व राहिले नव्हते. (Shiv Sena)
परंतु शिवसेना (Shiv Sena) पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (NCP) फुटला. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षाने राखी जाधव यांची निवड घोषित केली. जाधव या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्यानंतर हारुन खान यांनी शिवसेना उबाठा पक्ष (UBT Group) सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतल्यानंतरही त्यांचे मन लागल्याने तसेच मुंबईतील पक्षातील नेतृत्व दिशाहिन असल्याचे दिसून आल्यानंतर ज्योती आणि हारुन खान यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सन २०१९मध्ये शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी हारुन खान आणि त्यांच्या मुलाने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याचे फोटो व्हायलर झाले होते, परंतु त्यानंतर हारुन खान (Harun Khan) यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते, तसेच याचे खंडन केले होते. परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत पक्षातील आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निवडून आलेल्या ९ माजी नगरसेवकांपैंकी चार नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उर्वरीत पाच पैंकी दोन माजी नगरसेवक लवकरच शिवसेने प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. लवकरच किमान दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होईल असे खात्रीलायक सुत्रांकडून बोलले जात आहे. (Shiv Sena)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community