आणखी एका मोबाईल चोरामुळे तरुणीचा मृत्यू

घटनेत मृत्यू झालेली तरुणी ही मिझोराम राज्यातील असून सांताक्रूझ पूर्व कलिना व्हिलेज रोड येथे राहणारी होती.

मोबाईल चोराला विरोध करताना डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिलेचा कळवा येथे ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटनेला काही आठवडे उलटत नाही तोच ठाण्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. रिक्षामधून जाणाऱ्या एक तरुणीचा बाईकवरून आलेल्या चोरांनी मोबाईल खेचला असता या तरुणीचा तोल जाऊन धावत्या रिक्षातून पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ठाण्यातील तीन हात नाका येथे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नौपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी मुंब्रा येथून दोघांना अटक केली आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक

 घटनेत मृत्यू झालेली तरुणी ही मिझोराम राज्यातील असून सांताक्रूझ पूर्व कलिना व्हिलेज रोड येथे राहणारी होती. कन्मीला आरांगसू रायसींग (२७) असे या तरुणीचे नाव आहे. ठाण्यातील विवियाना मॉल येथील एका स्पा सेंटरमध्ये काम करणारी कन्मीला आरांगसू रायसींग ही लालगुरसांगी चेचोमा फँन्चुंन (३०) या सहकारी मैत्रिणीसह बुधवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथून रिक्षाने घरी जात असताना ठाणे तीन हात नाका येथे पाठीमागून बाईकवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने कन्मीला हिच्या हातातील मोबाईल फोन खेचून पळून जाऊ लागला. तेव्हा  कन्मीला हीचा धावत्या रिक्षातून तोल जाऊन ती रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. रिक्षाचालक आणि सोबत असलेल्या मैत्रिणीने ताबडतोब तिला त्याच रिक्षातून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून कन्मीला रायसिंग हिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन कन्मीला रायसिंग हिची मैत्रीण लालगुरसांगी चेचोमा फँन्चुंन हीचा जबाब नोंदवून बाईकवर आलेल्या दोन मोबाईल चोराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना गुरुवारी मुंब्रा येथून अटक केली आहे.

(हेही वाचा : यंदा ५वी पास मुन्नाभाई १०वी पास होणार! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here