मंत्रालयात (Mantralaya) पुन्हा एकदा एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयातील वरच्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अरविंद बंगेरा असे या व्यक्तीचे नाव असून या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने वारंवार वडापावची गाडी तोडण्यात येत असल्याने या व्यक्तीने आंदोलन केले असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.
(हेही वाचा Eknath Shinde: राहुल गांधींकडून हिंदु धर्मातील साडेतीन शक्तिपीठांचा अपमान, एकनाथ शिंदेंचा आरोप)
संरक्षण जाळीमुळे दुर्घटना टळली
बोरवलीमधील या वडापाव विक्रेत्याने हे आंदोलन नेमके कशासाठी केले, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, या व्यक्तीने मंत्रालयातून वरच्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे मंत्रालयात (Mantralaya) काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंत्रालयात यासाठी आधीच संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर व्यक्ती पडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, या दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणाबाजी करत प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. ही व्यक्ती अरविंद बंगेरा असून ते बोरिवली येथे राहत असल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे. तसेच ते वडापावची गाडी चालवतात. मात्र. प्रशासनाच्या वतीने वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे.
Join Our WhatsApp Community