- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील उद्यान, मैदान आणि मनोरंजन मैदानांची वार्षिक देखभालीकरता मागवण्यात आलेल्या निविदेतील अनिमितता आणि भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तक्रार करत चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता ऍड. सागर देवरे यांनीही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (BMC)
या निवेदनात ऍड. देवरे यांनी मुंबईतील उद्यान, मैदान आणि मनोरंजन मैदानांची वार्षिक देखभालीकरता महापालिका उद्यान विभागाच्या वतीने २०० कोटी रुपयांच्या निविदा निमंत्रित करण्यात आल्या होत्या, त्या निविदा मागील आठवड्यात खुल्या करण्यात आल्या. या निविदेत २४ वार्ड करता स्वत्रंत निविदा मागवल्या जात असताना तीन ठिकाणी प्रायोजिक तत्वावर निविदा परिमंडळ एक, तीन आणि पाच अशाप्रकारे परिमंडळनिहाय आणि तर उर्वरित तेरा निविदा वॉर्ड निहाय मागविण्यात आल्या. त्यामुळे अशा पद्धतीने एकाच प्रकारच्या कामांसाठी दोन पद्धतीने निविदा मागविण्याच्या पद्धतीमुळे कुठे तरी उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि कामांवर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. आजवर २४ वॉर्ड करता स्वतंत्र निविदा काढल्या जात असताना तीन परिमंडळांकरता निविदा काढून बाकीचे वॉर्ड या करता स्वतंत्र निविदा का काढण्यापेक्षा सर्वच निविदा परिमंडळ निहाय का मागवल्या गेल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (BMC)
(हेही वाचा – दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर)
मुंबईकरांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान
वॉर्ड निहाय निविदेत कंत्राटदार कंपन्या या वजा ३८ टक्के पर्यंत बोली लावतात आणि परिमंडळ निहाय मागवलेल्या निविदेत कंत्राटदार कंपन्या वजा १२ ते १६ टक्के बोली लावतात आणि त्यांना या दरात कामे दिली जातात. एकाच प्रकारच्या कामांसाठी वॉर्ड निहाय निविदेत कंत्राटदार कंपन्या या वजा ३८ टक्के पर्यंत कमी दर लावून काम करण्यास तयार असतो तेथे परिमंडळ निहाय मागवलेल्या निविदेत कंत्राटदार कंपन्या केवळ वजा १२ ते वजा १६ टक्के कमी दरात काम करण्यास तयार होऊनही त्यास काम दिले जाते. यामध्ये मुंबईकरांच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप ऍड. सागर देवरे यांनी केला आहे. (BMC)
कामाचे स्वरूप प्रत्येक विभागात सारखे आहे आहे. तर मग परिमंडळ निहाय कंपन्या अधिक दरात आणि वॉर्ड निहाय कंपन्या कमी दरात काम करत आहेत. तर परिमंडळ निहाय कंपन्यांशी वाटाघाटी करून वॉर्ड निहाय कंपन्यांनी लावलेल्या दरात त्यांना कामे करून घेण्यासाठी प्रयत्न का केला जात नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. परिमंडळ निहाय निविदेत ठराविकच कंपन्यानी सहभाग घेतला असून परिमंडळ निहाय निविदेत सहभागी झालेल्या कंपन्यांनी संगनमत करून कामे मिळविली आहेत. आणि यामध्ये महापालिकेचा वरिष्ठ अधिकारी अधिकारी सहभागी असून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार स्पष्टपणे दिसून येत असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सदर बाबत सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत ही निविदा अंतिम करून कंत्राट मंजुरी देण्यात येऊ नये. तसेच या सर्वांची अनामत रक्कम रोखून ठेवत याची पूर्ण चौकशी करण्यात करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून न्याय मागवा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community