Targeted Killing: जम्मू-काश्मिरात पुन्हा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’; गोळ्या झाडून हत्या

189

जम्मू-काश्मिरात जिहादी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’ केल्याची घटना घडली आहे. पुलवामा जिल्ह्यातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय काशीनाथ शर्मा नामक तरुणाला जिहादी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अचन गावातील संजय काशीनाथ पंडित हा तरुण बाजारात जात असताना रविवारी सकाळी ११ वाजता जिहादी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या संजयला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी नाकेबंदी करून जिहादी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी या घटनेची निंदा करत हिंदू तरुणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय.

(हेही वाचा – बालाकोट एअर स्ट्राईकला ४ वर्ष पूर्ण! भारताने असे उद्धवस्त केले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.