Veer Savarkar : राष्ट्रकूटतर्फे ‘अनुभव कोलूचा’ उपक्रम; वीर सावरकरांना देणार अनोखी मानवंदना

200
स्वातंत्र्यसैनिकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळी त्यांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागल्या. असह्य वेदना होऊनही त्यांना कोलू फिरवावा लागला. वीर सावरकर यांना मानवंदना देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असलेला कोलू फिरवण्याचा उपक्रम राष्ट्रकूट मासिकाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. १९ आणि २० ऑगस्ट २०२३ रोजी हा सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
वीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना, कोलू फिरवताना किती यातना भोगल्या याचा अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने घेता येणार आहे. यात सहभाग घेणाऱ्यांना राष्ट्रकुट मासिक प्रमाणपत्र देणार आहे. कोरोना काळाच्या उत्तरार्धात राष्ट्रकुट मासिकाचे प्रथम प्रकाशन झाले. आजतागायत यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे.  देव, देश आणि धर्म यासोबत सामाजिक बांधिलकी असलेले लेख या मासिकात प्रकाशित होतात. राष्ट्रकुट मासिकातर्फे निबंधस्पर्धा, कवितास्पर्धा, ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या आगळ्या उपक्रमाचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये कोलू ओढताना ज्या हाल अपेष्टा अनुभवल्या त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी किंवा अनुभव घेऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राजन देसाई (कार्यकारी संपादक) ८७७९९८३३९०. प्रा. महेश कुलकर्णी (उपसंपादक- सोशल मिडीया ) ९२२९८४९६५० किवा राहुल येल्लापूरकर (सहसंपादक)- १९२०८६१७२० याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.