anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प

170
anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प
anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प

रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणारा महत्वाचा रस्ता असणारा अणुस्कुरा घाटात (anuskura ghat land slide) मध्यरात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दरड कोसळली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. (anuskura ghat land slide)

(हेही वाचा –Pune-Nashik Expressway ला तूर्तास स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना)

कोल्हापूर जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अणुस्कुरा घाटात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री या घाटात अचानक मोठी दरड कोसळली. यामुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घटनेत जीवित हानी झाल्याची अद्याप माहिती नाही. या घटनेमुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. ही दरड रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोसळली आहे. (anuskura ghat land slide)

घाटात सध्या युद्ध पातळीवर दरड काढण्याचे काम सुरू असून ही दरड पूर्णपणे काढल्यावर या मार्गावरील वाहतूक ही पुन्हा सुरु केली जाईल. मात्र, हा रस्ता तोपर्यंत वाहतुकीसाठी बंद केला आहे. अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे. (anuskura ghat land slide)

(हेही वाचा –Pune University मधील औषधी वनस्पती उद्यानात दुर्मिळ वनस्पतींची लागवड)

घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. या साठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील मागवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (anuskura ghat land slide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.