स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘आपली छत्री आपणच रंगवा’ कार्यशाळेचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपली छत्री आपणच रंगवा’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत करण्यात आले आहे.

‘करूया रंगांची उधळण, स्मरण करूया आपल्या शूर जवानांचे, लाखो क्रांतिकारकांचे, अशी स्वांतत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या कार्यशाळेची संकल्पना आहे.’

या कार्यशाळेत जयोsस्तुते, ने मजसी ने, सागरा प्राण तळमळला, जय जय शिवराय, अनादि मी अनंत मी, स्वतंत्रते भगवती, हे हिंदुनृसिंहा, वंदेमातरम् अशा ओळी किंवा तुमच्या मनातल्या कल्पनांचे रंग या छत्रीवर रेखाटता येतील. काही गोष्टींबद्दल आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण आडकाठी करत असतो. त्याऐवजी आपण पुढाकार घेत एखादी गोष्ट केली तर ती आणखी सुंदर होऊ शकते. पावसाळ्यात आपण छत्री घेऊन फिरत असतो, अशावेळी ती छत्री आपणच रंगवलेली असेल तर तुम्हाला निश्चितच अभिमान वाटेल. यामागे एक साधी कल्पना आहे की, स्वत:ची भीती घालवून आपल्या मनातील आकार मांडता यायला हवेत. असे कार्यशाळेचे मार्गदर्शक अच्युत पालव यांनी सांगितले.

  • या कार्यशाळेची प्रवेश फी १ हजार ७५० रुपये, कार्यशाळेत तुम्हाला छत्री, ब्रश, अ‍ॅक्रॅलिक रंग छत्री रंगवण्यासाठी दिले जातील.
  • प्रवेशासाठी संपर्क – ९२२०० ७०३८६.
  • पत्ता – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक २५२, वीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (प.) मुंबई – ४०००२८.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here