वातावरणातील उष्ण हवामानाचा परिणाम भाजीपाल्यांवरही होत आहे. सध्या पाऊस कमी प्रमाणात पडत असल्यामुळे उकाडा वाढला आहे. याचा परिणाम भाज्यांवर झाल्याचे दिसत आहे. वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात मेथी, कोथिंबीर आणि इतर पालेभाज्या सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालेभाजीचा दर्जा खालावत असल्याचे दिसत आहे.
उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर वाढतात, मात्र पावसाळा सुरू होताच हे दर आटोक्यात येतात. यंदा समाधानकारक पाऊस पडत नसल्याचे दिसते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी बरसतात शिवाय पावसाने दिर्घकाळ उसंत घेतल्याचेही पाहायला मिळत आहे. वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे पालक, शेपू, पुदिना, मेथी आणि कोथिंबिरीची आवक वाढली आहे, मात्र 30 ते 40 टक्के पालेभाज्या सुकून खराब होऊन जात आहेत. त्यामुळे या आठवड्यात दर स्थिर आहेत.
(हेही वाचा – First Lady Jill Biden : बायडेन यांच्या भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; लेडी बायडेन कोरोना पॉझिटिव्ह )
भाज्यांचे नवीन दर…
सोमवारी एपीएमसीत ५९२०० क्विंटल मेथी आवक असून प्रतिजुडी बाजारभाव १० ते १२ रुपये, कोथिंबीर १९५९०० क्विंटल आवक असून ८ ते १० रुपये, १४७०० क्विंटल शेपूला ७ ते ८ रुपये, पुदीना ७१६०० क्विंटल दाखल झाला असून ४ ते ५ रुपये, तर पालक १६३८०० क्विंटल आवक झाली असून ६ ते ८ रुपये दराने विक्री होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community