App Based Cabs : मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत ५९० वाहनांची तपासणीमध्ये १०७ दोषी वाहनांवर ७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत ७८२ वाहनांची तपासणीमध्ये २११ वाहने दोषी आढळली आहेत.

199
App Based Cabs : मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल
App Based Cabs : मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल

मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब (App Based Cabs) वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान विहीत केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांत १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ॲप आधारित १६९० कॅब वाहनांची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या ४९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी १९ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. (App Based Cabs)

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत ५९० वाहनांची तपासणीमध्ये १०७ दोषी वाहनांवर ७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत ७८२ वाहनांची तपासणीमध्ये २११ वाहने दोषी आढळली आहेत. यामध्ये ७ लक्ष ९३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई (पूर्व) कार्यालयांतर्गत 318 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १७३ वाहने दोषी आढळली व त्यांच्याकडून ४ लक्ष ४१ हजार ४०० रुपयांचे दंडापोटी तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. (App Based Cabs)

(हेही वाचा – Fake SBI Branch : आता बॅंकही डुप्लीकेट; तमिळनाडूमध्ये उघडकीस आले धक्कादायक कृत्य)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) १३ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात ॲप आधारित वाहनांसाठी महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ द ॲग्रेगेटर रुल्स, २०२२ करण्यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने (Central Govt) २७ नोव्हेंबर २०२० रोजी समुच्चयक मार्गदर्शक सूचना ॲप आधारित कॅब (App Based Cabs) सेवा देणाऱ्या आस्थापनांकरीता निर्गमित केल्या आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पूर्व) विनय अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. (App Based Cabs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.