विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप विकसित करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती

28
विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप विकसित करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती
  • प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने दिनदर्शिका तयार केली जाईल तसेच विद्यार्थ्यांना तपासणीपासून वंचित राहू नये यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्याची योजना आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (आरबीएसके) अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थितीत करण्यासाठी नियोजन करावे तसेच नाशिक आणि दमण येथील आरोग्य तपासणी ॲपचा अभ्यास करून संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक ॲप तयार करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

(हेही वाचा – CM Medical Assistant Medical Fund ची दमदार कामगिरी; एकाच दिवशी १७१ रुग्णांना १ कोटींहून अधिक अर्थसहाय्य)

मंत्रालयात आरबीएसके बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे (Dada Bhuse) म्हणाले की, आरोग्य तपासणीपूर्वी पालकांना सूचित करण्याची जबाबदारी शाळांची असेल. तपासणी दरम्यान विद्यार्थी अनुपस्थित राहू नयेत यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा आता मराठीतून; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान आणि आरोग्य सुरक्षा

यावेळी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा जिल्हानिहाय आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ‘आरबीएसके’च्या माध्यमातून नियमित तपासणीसोबतच तातडीच्या उपचारांवरही भर द्यावा, अशी सूचना करण्यात आली.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वेळेवर व्हावी यासाठी आरोग्य विभाग दक्ष राहील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ॲप विकसित करण्याचा हा निर्णय शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची सुधारणा घडवून आणेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.