दिवाळीत गड दुर्गांना (Fort) साकारणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करताना तरुण मावळ्यांनी शिवकार्याची माहिती देणारे पोवाडे म्हणायला हवेत. कारण पोवाड्यातून शिवकाळातील युद्धनीती, शस्त्र, रणभूमी आदींची माहिती मिळते. दिवाळीत गड दुर्ग साकारणाऱ्या तरुणांनी गडावर जायला हवे, गड पहायला हवेत. मात्र नुसत्या गडाच्या वाऱ्या करण्यात अर्थ नाही तर गड दुर्गाचे धारकरी व्हायला हवे. गड दुर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपण अथक परिश्रम करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देश, धर्म, संस्कृती राखली पण आता आपण जनजागृती करून इतिहास समजून घेतला पाहिजे, असे सांगत किल्ले हा शब्द फारसी, दुर्ग हा शब्द संस्कृत आणि गड हा शब्द महाराष्ट्रात शिवरायांनी आणला आहे, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब (Appa Parab) यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.(Fort) (Appa Parab)
(हेही वाचा : Naxalite Attack: तेलंगणातील मुलुगु येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार)
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीच्या वतीने दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पराक्रमी वीरांच्या शौर्याचे प्रतीक असणाऱ्या गड दुर्गांना साकारणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘जागर गडदुर्गांचा, दीप दुर्गोत्सव सोहळा २०२४’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडदुर्ग साकारणाऱ्या तरुण मावळ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते. (Fort) (Appa Parab)
हिंदू धर्म टिकवण्यासाठी हिंदूंचे राज्य हवे : रणजित सावरकर (Ranjit Savarkar)
जगण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वांतत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास अभ्यासावा. तसेच हिंदू म्हणून जगायचं असेल तर हिंदूंच राज्य असणे गरजेचे आहे. अन्यथा बांगलादेशातील हिंदूंसारखी आपली स्थिती होईल. त्याचबरोबर स्वसंरक्षण हा आपला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांला स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.
गड दुर्गांच्या स्वच्छेतेसाठी मोहीम करावी लागणे, हे आपले दुर्दैव : मंजिरी मराठे (Manjiri Marathe)
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातृभूमीला आपल्या आयुष्यात प्रथम मानले. आपल्यासारख्या तरुणांना इथे मावळे संबोधण्यात आले आहे. त्यामुळे मावळ्यांनी ‘राष्ट्रप्रथम’ ही भावना मनात रुजवायला हवी. तसेच गडकोटावर स्वच्छतेसाठी नाही तर इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी प्रदीर्घ इतिहासाची अनुभूती घेण्यासाठी आपण गडकोटावर जायला हवे. आज गड दुर्गांच्या स्वच्छेतेसाठी मोहीम करावी लागणे, हे आपले दुर्दैव आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना आपण शस्त्राशस्त्र शिकवायला हवीत, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी केले.
धर्मयुद्धासाठी हिंदूंनो जागृत व्हा : सुनील पवार(Sunil Pawar)
कोणतं पद मिळावं म्हणून महाराजाचं काम करत नसून धर्मयुद्धासाठी मावळे तयार करण्यासाठी दुर्गराज रायगड समितीद्वारे काम करतोय. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी हिंदूंनी जागृत व्हायला हवे, असे विधान श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांनी केले.(Fort)
Join Our WhatsApp Community