लोकशाही व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी, मतदान करा, उपराष्ट्रपतींचे आवाहन

122

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतभर साजरा केला जातो. या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी नागरिकांना आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत विशेष आवाहन केले आहे.

उपराष्ट्रपतींचे ट्विट

“राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लक्षात ठेवा की, मताधिकार फक्त अधिकारच नाही, तर दायित्व आहे. गणतंत्राचा आधार आहे. याची शुचिता कायम ठेवा. संकुचित पूर्वाग्रह बाजूला सारत राष्ट्राच्या दीर्घकालीन हितांसाठी याचा प्रयोग करा. सार्वजनिक जीवनास स्वच्छ ठेवत लोकशाही व्यवस्था सक्षम बनवूया.” असं ट्विट करत उपराष्ट्रपतींनी देशातील नागरिकांना संदेश दिला आहे.

( हेही वाचा: अडीच महिन्यांनंतर अखेर मुख्यमंत्र्यांचे होणार प्रत्यक्ष दर्शन! )

मतदार दिनाविषयी

जगातील भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मतदानासंदर्भात घसरणारा कल पाहता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी शेकडेवारी यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने सन २०११ पासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.