SSC & HSC Board Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

58
SSC & HSC Board Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन
SSC & HSC Board Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे बाकी असेल तर त्यांना दहावी / बारावी परीक्षेचे (SSC & HSC Board Exam) हॉल तिकीट (Hall Ticket) दिले जात नाही, अशा काही तक्रारी नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. सदरची बाब अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्याच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. (SSC & HSC Board Exam)

हेही वाचा-सर्व औषधांची नवीन नियमावलीप्रमाणे गुणवत्ता तपासणी करा, मगच वापरा; Prakash Abitkar यांचे निर्देश

तरी या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनांना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात येते की, एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरणा करणे (Maharashtra SSC Hall Ticket 2025) पालकांच्या काही अडचणींमुळे शक्य होत नसेल तर त्यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक शुल्क भरणा करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना शुल्क भरता यावे याकरिता पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. तथापि दहावी / बारावी (HSC Board Exam) परीक्षेचे (SSC & HSC Board Exam) हॉल तिकीट न देता त्यांची अडवणूक करु नये. शाळा सोडताना शाळेचा दाखला देण्यापूर्वी शैक्षणिक शुल्क भरून घेण्याचा पर्याय शाळा व्यवस्थापनाकडे उपलब्ध असताना अशा प्रकारे हॉल तिकीट देताना अडवणूक करणे अयोग्य आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे व्यवस्थापनाने म्हटलं आहे. (SSC & HSC Board Exam)

हेही वाचा-पोलिसांच्या बदल्या तात्पुरत्या नाही ; ‘मॅट’ने दिलेला निर्णय High Court ने केला रद्द

सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाववरुन (Admit Card) लिंक (Link)व्दारे डाउनलोड (Download) करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. (SSC & HSC Board Exam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.