ग्राहकांची माहिती चोरली! ऍपल, गुगलला लावलेला दंड पाहून व्हाल थक्क

153

सध्या सोशल मीडिया तरुणाच्या गळ्यातील ताईत झालं आहे. पण, या सोशल मीडियावर सोशल होणं आपल्याला किती सोसेल हे सांगता येत नाही. कारण दिवसाला सोशल मीडियावर आापल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत हजारो तक्रारी येत असतात. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर किती सुरक्षित आहे हा प्रश्न कायम असतो. सोशल मीडियावरुन माहिती बेकायदेशीररीत्या विकून कंपन्या कोट्यवधी रुपये कमावतात. आता याच मुद्द्यावरुन अॅपल आणि गुगल या कंपन्यांना 11.3 दशलक्ष डॅालर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

कन्झ्युमर कोड नियमाचे उल्लंघन

इटलीतील स्पर्धा प्राधिकरणाने दोन्ही कंपन्यांना हा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या परवानगीविना त्यांची माहिती व्यावसायिक लाभासाठी या कंपन्यांनी वापरली. कन्झ्युमर कोडचे हे उल्लंघन असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. प्राधिकरणानुसार अॅपलकडून टूल्स आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून युझर्सच्या प्रोफाईलमधील माहितीचा वापर करण्यात येतो. डेटा ट्रान्सफर न करताच उत्पादनाचे प्रमोशन करण्यात येते. थर्ड पार्टी अॅप स्टोअर, आयट्यून्स आणि अॅपल बुकच्या माध्यमातून आर्थिक मूल्याचे शोषण करण्यात येते.

याआधीही ठोठावण्यात आला होता दंड 

इटलीच्या रेग्युलेटरने अॅपल आणि गुगलला दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 225 दशलक्ष डॅालर्सहून जास्त दंड ठोठावण्यात आला होता.

 (हेही वाचा:१ डिसेंबरपासून हार्बर मार्गावर कोणते होणार बदल? वाचा… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.