तुम्ही ‘या’ कंपनीचा फोन वापरताय? मग तुम्हाला 5G नेटवर्कसाठी पाहावी लागणार वाट

106

Airtel आणि Reliance Jio ने 5G सेवा सुरु केली आहे. परंतु, अनेक ग्राहकांना ही सेवा वापरता येणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, डिसेंबरपर्यंत Apple आणि Samsung मोबाईल फोनवर 5G सपोर्ट उपलब्ध असेल. म्हणजेच अॅपल आणि सॅमसंगच्या 5G फोन युझर्सना 5G साठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आता सॅमसंगनेदेखील याची माहिती दिली आहे. कंपनी टेलिकाॅम ऑपरेटर्ससोबत करार करत असल्याची महिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या 5G डिव्हाईससाठी ओटीए अपडेट नोव्हेंबर 2022 च्या मध्यापर्यंत मिळणार आहे. या ओटीए अपडेटनंतरच ग्राहकांना 5G सेवांचा वापर करता येणार आहे. यापूर्वी त्यांच्या मोबाईलमध्ये 5G सेवा येणार नाही.

( हेही वाचा: दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेवर 30 अतिरिक्त विशेष गाड्या )

ठराविक शहरांमध्ये सेवा

दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सुरु केल्यानंतरही सॅमसंग फोन युझर्सना सेवांचा वापर करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हळूहळू अनेक मोबाईल कंपन्या यासाठी अपडेट देणार आहेत. सध्या काही ठराविक शहरांमध्ये एअरटेल आणि जिओच्या ग्राहकांना 5G सेवा वापरत आहेत.

Airtel युझर्सना 4G प्लॅनवरच 5G सेवा वापरता येणार आहे. तर जिओ युझर्सना बिटा टेस्टिंगमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देत आहे. पुढील वर्षापर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवांचा लाभ घेता येणार आहे. याचाच अर्थ 5G सेवांसाठी आता ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.