- ऋजुता लुकतुके
फेब्रुवारी २०२४ मध्ये ॲपल कंपनीने (Apple Company) आपले स्वयंचलित कार उत्पादन आणि ॲपल वॉचसाठी अत्याधुनिक डिस्प्ले स्क्रीन बनवण्याचे दोन प्रकल्प रद्द केले. त्याचा फटका काही कर्मचाऱ्यांना बसला आहे. स्वयंचलित कार उत्पादनाचा खर्च खूप जास्त होता. त्या मानाने या प्रकल्पाला योग्य दिशा देण्यात कंपनीला यश आलं नाही. तसंच वॉच डिस्प्लेच्या (Watch display) बाबतीत घडलं. अभियांत्रिकी आणि वितरणाच्या अडचणींबरोबरच किंमत आटोक्यात ठेवण्यात कंपनीला यश आलं नाही. आणि हे दोन प्रकल्प फेब्रुवारीत कंपनीला रद्द करावे लागले. (Apple Lay-off)
(हेही वाचा- Statue of Liberty : जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळली वीज, जाणवले ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के)
पण, याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. कॅलिफोर्निया (California) मुख्यालयातील ६०० कर्मचाऱ्यांना यामुळे नारळ मिळाला आहे. सांता क्लॅरा इथं उभ्या राहणाऱ्या कार कंपनीतील कर्मचाऱ्यांना या निर्णयाची जास्त झळ बसली. काही कर्मचाऱ्यांना कंपनीने आपले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स या विभागात बदली करून दिली. (Apple Lay-off)
ॲपल कंपनीने (Apple Company) या कर्मचारी कपातीबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, काही कर्मचाऱ्यांना कंपनीने नोकरी जाऊ शकते अशा आशयाचे ईमेल पाठवले होते. त्यात चीनमधील काही कर्मचारी होते. तिथून ही बातमी बाहेर आली आहे. आताही अधिकृत आकडा कंपनीने स्पष्ट केलेला नाही. (Apple Lay-off)
(हेही वाचा- Alagappa Chettiar : भारतीय व्यापारी आणि समाजसेवक सर अलगप्पा चेट्टियार)
पण, स्वयंचलित कार प्रकल्पातून ३७१, वॉच डिस्प्ले (Watch display) प्रकल्पातून ८७ जणांना नारळ मिळाल्याचं समजतंय. हे कर्मचारी मुख्य कार्यालयाबरोबरच कंपनीच्या सॅटेलाईट कार्यालयांमधून म्हणजे जगभरातून कंपनीसाठी काम करणारे कर्मचारी आहेत. (Apple Lay-off)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community