Apple Let Loose : ॲपल कंपनीच्या ७ मेच्या कार्यक्रमात नेमकं काय होणार?

Apple Let Loose : ‘लेट लूझ’ अशी टॅगलाईन असलेला हा कार्यक्रम आयपॅडच्या घोषणेसाठी असेल असं बोललं जातंय. 

167
Apple Let Loose : ॲपल कंपनीच्या ७ मेच्या कार्यक्रमात नेमकं काय होणार?
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनीने ७ मेला एका विशेष कार्यक्रमाचं आमंत्रण मीडियाला दिलं आहे. या कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे ‘लेट लूझ’. ॲपल कंपनीचं कुठलंही नवीन उत्पादन लाँच होताना मोठा समारंभ करायची कंपनीची पद्धत आहे. आताही पाठवलेल्या आमंत्रणामध्ये ॲपल पेन्सिल दिसत असल्यामुळे नवीन आयपॅड लाँच होत असावा असा अंदाज लोकांनी बांधला आहे. आयपॅडसाठी कंपनी कुठलाही सोहळा आयोजित करणार नाही, असं पूर्वी कंपनीने म्हटलं होतं. पण, आता त्यांनी आपला बेत बदलेलला दिसत आहे. (Apple Let Loose)

ॲपल कंपनी आपला नवीन टॅबलेट संगणक लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय ११ इंच आणि १३ इंचांचा आयपॅड आणि आयपॅड प्रो सुद्धा लाँच होऊ शकतो. १३ इंचांचा आयपॅड खरंच लाँच झाला तर तो कंपनीचा सगळ्यात मोठा आयपॅड असेल. कारण, आतापर्यंत १२.९ इंचांचा आयपॅड हाच सगळ्यात मोठा होता. कंपनीचे नवीन आयपॅड हे ओएलईडी डिस्प्लेचे असतील अशीही चर्चा बाजारात रंगली आहे. तसं झालं तर आधीच्या एलसीडी स्क्रीनच्या तुलनेत हा डिस्प्ले अधिक स्पष्ट आणि प्रखर असेल. (Apple Let Loose)

(हेही वाचा – IPL 2024, Yashaswi Jaiswal : शतक झळकावल्यानंतर यशस्वी जयसवाल जेव्हा ब्रायन लाराकडे धावत जातो…)

नवीन सगळे आयपॅड हे एमथ्री श्रेणीतील असतील. फक्त आयपॅड आणि टॅबलेट संगणकच नाही तर मॅजिक की-बोर्ड आणि ॲपल पेन्सिलचं नवीन व्हर्जनही लाँच होऊ शकतं. अलीकडे कंपनीने सी-टाईप पोर्ट आणि कमी किमतीची एक पेन्सिल बाजारात आणली होती. पण, मॅजिक की-बोर्ड बरेच दिवसात अपग्रेड झालेला नाही. त्यामुळे ॲपल उत्पादन वापरणाऱ्या लोकांसाठी की-बोर्डचीही उत्सुकता असेल. २०२३ पासून कंपनीने एकही टॅबलेट बाजारात आणलेला नाही. त्यामुळे तब्बल १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर ॲपलचा नवीन आयपॅड बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Apple Let Loose)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.