राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणास प्रवेशासाठी २५ ऑगस्ट रोजी केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, २१ जुलैपर्यंत शुल्क चलन भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (SIAC Training)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी siac.org.in मधील SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET २०२४-२५ नोंदणीसाठीची लिंक मधील REGISTRATION NOW ला जाऊन प्रवेश अर्ज नोंदणी करावी. तसेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण २०२५ च्या अधिक माहिती siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सामाईक प्रवेश परीक्षा समनव्यक संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले आहे. (SIAC Training)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील पब्स, बार, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा चालणार!)
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, अंबरनाथ नगरपालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र, अंबरनाथ, ठाणे महानगर पालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे ई. केंद्रामधील प्रवेश परिक्षेसाठी सन २०२४ च्या अंतिम वर्षात पदवीला बसलेले व यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि जाहीरातीतील नमुद इतर अटी शतीर्ची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नागरी सेवा पूर्व परीक्षा निःशुल्क प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. (SIAC Training)
ही सुधारीत परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सात (मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर) केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदतवाढ १ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधीत आणि दिनांक २१ जुलै २०२४ पर्यत परीक्षा शुल्क चलन भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. (SIAC Training)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community