भिवंडी तालुक्यातील प्राचीन श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानचे मुख्य पर्यवेक्षक तथा जनसंपर्क अधिकारी म्हणून चक्क ख्रिस्ती धर्माचा व्यक्ती नियुक्त करण्यात आली आहे. फ्रान्सिस जोसेफ लेमॉस असे या व्यक्तीचे नाव आहे. श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या अध्यक्षांकडून याविषयीचे अधिकृत पत्रही फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांना पाठवण्यात आले आहे. मंदिरात येणारे देणगीदार आणि अतीमहत्त्वाच्या व्यक्ती, शासकीय अधिकारी यांचे स्वागत आणि पाहुणचार करणे, न्यायालयीन कामे, देवस्थानच्या जागांची पहाणी करणे, तसेच मंदिराच्या व्यवस्थापकांना सहकार्य करणे अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांच्यावर सोपण्यात आल्या आहेत.
हिंदूंमध्ये संताप
हे पत्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यावर ‘मंदिर व्यवस्थापक म्हणून हिंदू भेटला नाही का या विश्वस्त मंडळ अधिकारी यांना??? असा प्रश्न उपस्थित करत धर्मप्रेमी हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधींनी मंदिर व्यवस्थापनाकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. श्री वज्रेश्वरी देवीचे मंदिर हे अप्रतिम वास्तूकलेचा नमूना आहे. गरम पाण्याच्या झर्यासाठी वज्रेश्वरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने या मंदिराला ‘धार्मिक पर्यटनस्थळा’चा दर्जा दिला असून हे मंदिर आणि परिसर यांचा राज्यशासनाकडून विकास करण्यात येणार आहे. नाथ संप्रदायातील मध्ययुगीन संस्कृतीमध्ये श्री वज्रेश्वरी मंदिराचा उल्लेख आढळतो. वज्रेश्वरीदेवीचे जुने मंदिर येथील जुंगकाटी या गावी होते. सध्याचे मंदिर चिमाजी अप्पा यांनी बांधल्याचे ऐतिहसिक संदर्भ उपलब्ध आहेत.
(हेही वाचा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे हिंदू तरुण ५ दिवस होते तुरुंगात )
Join Our WhatsApp Community