Russia : रशियातील बड्या कंपनीच्या संचालक मंडळावर भारतीयाची नेमणूक

215

रशियन तेल क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्ट ऊर्जा कंपनीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) चे माजी संचालक जीके सतीश म्हणजेच गोविंद कोटीस सतीश यांची त्यांच्या बोर्डावर नियुक्ती केली आहे. रशिया भारताबरोबरचे व्यावसायिक संबंध वाढविण्याच्या विचारात असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. ऊर्जा कंपनी Rosneft ने जारी केलेल्या निवेदनानुसार, जीके सतीश हे Rosneft च्या ११ जणांच्या संचालक मंडळावर निवडून आलेल्या तीन नवीन सदस्यांपैकी एक आहेत. रोझनेफ्टच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय आहेत. ६२ वर्षीय जीके सतीश आयओसीमध्ये व्यवसाय विकास संचालक होते. त्यांनी २०२१ मध्ये IOC मधून निवृत्ती घेतली.

रोझनेफ्टच्या मंडळात कतार आणि फिलिपिन्सचे प्रतिनिधीदेखील आहेत. “मोहम्मद बिन सालेह अल सदा (दोहा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष) यांची रोझनेफ्ट ऑइल कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे,” असंही रोझनेफ्टने सांगितले आहे. Rosneft ची रशियातील तेल आणि वायू क्षेत्रातील भारतीय कंपनी IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी आहे. रोझनेफ्ट IOC आणि इतर भारतीय कंपन्यांना कच्चे तेल देखील विकते आणि अलिकडच्या काही महिन्यांत गुजरात रिफायनर्सनाही तेलाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जीके सतीश यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते, कारण Rosneft आता भारतीय कंपन्यांबरोबर लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) च्या विक्रीसह अधिक करार करण्याकडे लक्ष देत आहे.

(हेही वाचा Muslim : पनवेलमध्ये मुसलमानांकडून कट्टरतेचे प्रदर्शन; रेल्वेस्थानकातच केले नमाज पठण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.