महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची वर्णी लावण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाने मंगळवारी सौनिक यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. विद्यमान अध्यक्ष अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदाची मुदत २० सप्टेंबर २०२४ रोजी संपत आहे. ही मुदत संपल्यानंतर सौनिक आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. (Manoj Saunik)
महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये महारेराच्या अध्यक्षपदी मेहता यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांची मुदत संपण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता काळात सरकारला कोणत्याही नेमणुका, बदल्या करता येत नाहीत. त्यामुळे सरकारने दोन महिने आधीच सौनिक यांच्या नियुक्तीचे आदेश काढून त्यांचा मार्ग मोकळा केला आहे. (Manoj Saunik)
(हेही वाचा – BMC : गिल्बर्ट हिलमधील अतिक्रमित भूखंड महापालिका ताब्यात घेणार?)
महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले मनोज सौनिक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८७ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. ३० एप्रिल २०२३ रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली होती. आठ महिन्यानंतर सौनिक हे ३१ मे २०२३ रोजी मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौनिक यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून केली होती. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महारेराच्या प्राधिकरणावर नियुक्ती देण्यात आली आहे. (Manoj Saunik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community